भजनी मालिका
← भजनांकडे परत

पराचे ते दोष आणू नये मनीं । जयाची ते करणी त्याजसवें

parache te dosh anu naye manin | jayachi te karani tyajasaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पराचे ते दोष आणू नये मनीं । जयाची ते करणी त्याजसवें ॥१॥ विषाचिया अंगी नोहे अमृतकण । मारकक तें जाण विष होय ॥२॥ सर्पाचिये अंगीं शांतीचा कळवळा । कोणा पाहे डोळा भरूनि दृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं जैसा ज्याचा गुण । तैसें तें लक्षण बद्धक त्यांसी ॥४॥