भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचें सुख पुंडलीक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं

pandharichen sukh pundalik janen | yer soy nenen tethil pain

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंढरीचें सुख पुंडलीक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ॥१॥ उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नानें पावन जगा करितसे ॥२॥ मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनीं । पैल ते जघनी कटीं कर ॥३॥ एका जनार्दनी विठ्ठल बाळरुप दरुशनें ताप हरे जगा ॥४॥