भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंधरयाची खाणी अनर्घ्यरत्नाचें पाणी

pandharayachi khani anarghyaratnachen pani

पंधरयाची खाणी अनर्घ्यरत्नाचें पाणी । तें निरंजनीं वनीं शोभतसे वो माय ॥१॥ गुणांची लावणी लाविली गगनीं । निरंजनीं निर्गुणीं आथिले वो माय ॥२॥ पूर्णानंद सच्चिदानंदकंदु तो निरंजनीं स्वादु आळवीतो माय ॥३॥ लक्ष कोटी एकला अनंतगुणी जाहाला । तो अंगें अंगवला निजस्वरुपीं वो माय ॥४॥ ब्रह्मरसें भरला दाहीं दिशा व्यापिला । आनंदु सच्चिदानंदी वोसंडला वो माय ॥५॥ ऐसा सुखसंवादु सागर भरला । रखुमादेविवरा विठ्ठला वो माय ॥६॥