भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचविसांचे दृष्टी । शिवा नाहीं तेथें भेटी

panchavisanche drushti | shiva nahin tethen bheti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंचविसांचे दृष्टी । शिवा नाहीं तेथें भेटी ॥१॥ छत्तिसां वेगळा । भरला असें तो निराळा ॥२॥ चाळिसाचे ध्यानीं मनीं । कदा नये शुळपाणी ॥३॥ ऐसे विचारे भागले । तया नाहीं रुप कळलें ॥४॥ एका जनार्दनीं रुप । स्वयं प्रकाश अमूप ॥५॥