भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचक्रोशी पाप नसे । ऐसा देव तेथें वसे

panchakroshi pap nase | aisa dev tethen vase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंचक्रोशी पाप नसे । ऐसा देव तेथें वसे ॥१॥ चला चला पंढरपुरा । दीन अनाथांच्या माहेरा ॥२॥ चंद्रभागे करितां स्नान । होती कोटी कुळें पावन ॥३॥ एक जनार्दनीं भेटी । तुटे जन्ममरण गांठीं ॥४॥