भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळण्याची परी सांगेन आतां

palanyachi pari sangen atan

पाळण्याची परी सांगेन आतां । पाळण्या तान्हुलें बोंभाते देहेविणेम ताता ॥१॥ तेथें जनुक नव्हे जननी नव्हे । बाळक नवे होये मासे विण ॥ध्रु०॥ तेथें तेल सारुनि अभ्यंग केलें । बाळक पुसिलें अंबरवर्णे ॥२॥ बापरखुमादेविवरु अनुभवित जाले । ते निजरुप पावले परब्रह्मीं ॥३॥