भजनी मालिका
← भजनांकडे परत

पळभरी संतसंगती । कोटीयुगें तया विश्रांती । ऐसें बोलतसे श्रुती । पाहे पां जना

palabhari santasangati | kotiyugen taya vishranti | aisen bolatase shruti | pahe pan jana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पळभरी संतसंगती । कोटीयुगें तया विश्रांती । ऐसें बोलतसे श्रुती । पाहे पां जना ॥१॥ वेदशास्त्रा पुराण । महिमा संतांचाचि जाण । शुकादिक रंगून । रंगले रंगीं ॥२॥ अर्जुना उपदेशिलें । उद्धवातें बोधिलें । व्यासादिक रंगलें । हृदयीं सदा ॥३॥ तें दृढ हृदयीं धरी । आणीक नको पाहुं फेरी । एका जनार्दनीं धरीं । हृदयामाजीं ॥४॥