भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतो देखतो कानीं जें ऐकतो । परी सदाचि पाहतो संसार मनीं

pahato dekhato kanin jen aikato | pari sadachi pahato sansar manin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतो देखतो कानीं जें ऐकतो । परी सदाचि पाहतो संसार मनीं ॥१॥ मीनाचिये परी गुंतलासे जळीं । परी संसारा कवळी अधम तो ॥२॥ दानधर्म कांहीं न वेंचे आडका । रुक्यासाठीं थडका घेत असे ॥३॥ एका जनार्दनीं संसारावेगळा । कैं मी गोपाळा होईल साचा ॥४॥