भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहातें पाहाता निरुतें

pahaten pahata niruten

पहातें पाहाता निरुतें । पाहिलिया तेथें तेंचि होय ॥१॥ तोचि तो आपण श्रीमुखे आण । आणिक साधन नलगे कांहीं ॥२॥ भानुबिंबेवीण निरसलें तम । ज्ञानदेवी वर्म सांगितलें ॥३॥