भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां सप्त पाताळें एकविसांवेगळें

pahatan sapta patalen ekavisanvegalen

पाहातां सप्त पाताळें एकविसांवेगळें । तें निरंजन आगळें खुतलें डोळांगे माय ॥१॥ पांवा वाहे तळालोरी नादु उमटे अंबरीं । तया सुखसागरीं बुडालें वो माय ॥२॥ सुखसंवादु लागला जिवनी जिवनु भेटला । भेटीं देऊनि गुंतला मनोमंदिरीं वो माय ॥३॥ आतां न सोडी न राहे आणिकु न पाहे । तंव हाचि लवलाहे मिळाला वो माय ॥४॥ आवडी रिघालें घर आपुलें । सहजीं सामावलें स्वरुपीं वो माय ॥५॥ वैराग्य-भक्तिज्ञानाची माउली । ते रखुमादेविवरविठ्ठली भेटलीं वो माय ॥६॥