भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहणें पाहातें । गेलें हारपोनियां निरुतें

pahanen pahaten | gelen haraponiyan niruten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाहणें पाहातें । गेलें हारपोनियां निरुतें ॥१॥ मीहि नाहीं तूंही नाहीं । आपींआप अंतरबाहीं ॥२॥ उदो अस्तु सविता नेणें । जेथें तेथें आपुलेपणें ॥३॥ निळा म्हणे नर्भी नभ । जेवीं दावूनियां प्रतिबिंब ॥४॥