भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदार्थमात्रीं आठवे जरी । नलगेचि तरी साधन

padarthamatrin athave jari | nalagechi tari sadhan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पदार्थमात्रीं आठवे जरी । नलगेचि तरी साधन ॥१॥ एरवीं दिसे देखणा तोचि । पाहिजे त्याची परि कृपा ॥२॥ अवघाचि वसोनि अवघे ठायीं । दिसे दाखवीही अवघ्यांतें ॥३॥ निळा म्हणे भोगी त्यागी । तोचि जगीं जगदात्मा ॥४॥