भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदपदार्थ संपन्नता

padapadartha sampannata

पदपदार्थ संपन्नता । व्यर्थ टवाळी कां सांगता । हरिनामीं नित्य अनुसरतां । हें सार सर्वार्थी ॥१॥ हरिनाम सर्व पंथीं । पाहावें नलगे ये अर्थी । जें अनुसरलें ते कृतार्थी । भवपंथा मुकले ॥ कुळ तरलें तयाचें । जींही स्मरण केलें नामाचें । भय नाहीं त्या यमाचे । सर्व ग्रंथीं बोलियेलें ॥३॥ नलगे धन नलगे मोल । न लगति कष्ट बहुसाल । कीर्तन करितां काळ वेळ । नाहीं नाहीं सर्वथा ॥४॥ हरि सर्व काळ अविकळ । स्मरे तो योगिया धन्य केवळ । त्याचेनि दर्शनें सर्वकाळ । सफ़ळ संसार होतसे ॥५॥ ज्ञानदेवी जप केला । मन मुरडुनी हरि ध्याइला । तेणें सर्वागीं निवाला । हरिच जाला निजांगें ॥६॥