भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओवाळूनियां सांडीन काया । वरुनी पायां तुमचीया

ovaluniyan sandin kaya | varuni payan tumachiya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ओवाळूनियां सांडीन काया । वरुनी पायां तुमचीया ॥१॥ जीवभाव ठेवुनी वरी । राहेन व्दारीं तिष्ठत ॥२॥ जोडूनियां कृतांजुळी । नामावळी आठवीन ॥३॥ निळा म्हणे करीन सेवा । अहोरात्रीं देवा चरणांची ॥४॥