भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा

omnamo dnyaneshvara | karunakara dayala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥ मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥