भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया । तें पुंडलिक भुलवोनि आणिलें या ठायां

omkar sah makar adi ant nahin jaya | ten pundalik bhulavoni anilen ya thayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया । तें पुंडलिक भुलवोनि आणिलें या ठायां ॥१॥ भुललें वो माय पुंडलिकांप्रीतीं । उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ॥२॥ अथरा पुराणांसी वाडशास्त्रें वेदादती ॥ तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ति ॥३॥ वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पैं वेवादती । तोएका जनार्दनांचे ह्रुदयी सांवळा घेउनि बुंथीं ॥४॥