भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्मिला म्हणसी परेचा विस्तार

nirmila mhanasi parecha vistar

निर्मिला म्हणसी परेचा विस्तार । तेथें हा विचार वांयावीण ॥१॥ पर नाहीं तेथें अरुतें कैंचे । आदिमध्य साचें कळिका हरि ॥२॥ नाहीं त्या सन्मान विकृति उपरमु । दिपीं दीप समु शेजबाजे ॥३॥ बापरखुमादेविवरु परेसि परता । हा विचारु अरुता दिसे भान ॥४॥