भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्जिवां दगडांची काय करिसिल सेवा

nirjivan dagadanchi kay karisil seva

निर्जिवां दगडांची काय करिसिल सेवा तो तुज निर्देवा देईल काय ॥१॥ कवणे गुणें भुली पडली गव्हारा । तीर्थाच्या माहेरा नोळखिसी ॥२॥ अष्टोत्तरशें तीर्थे जयाच्या चरणीं । तो तुझ्या ह्र्दयीं आत्मरामु ॥३॥ देह देवळीं असतां जासी आना तीर्था । मुकलासि आतां म्हणे ज्ञानदेवो ॥४॥