भजनी मालिका
← भजनांकडे परत

निराशियाचे भेटी पाहे । वैकुंठींचा राव धांवे

nirashiyache bheti pahe | vaikunthincha rav dhanve

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निराशियाचे भेटी पाहे । वैकुंठींचा राव धांवे ॥१॥ निराशेपायीं न ये व्याधीं । निराशेपायीं सकळ सिद्धी ॥२॥ निराशाचें जेथें नांव । तेथें देव घेतसे धांव ॥३॥ निराशेचा जिव्हाळा । एक जनार्दनीं पाहे डोळा ॥४॥