भजनी मालिका
← भजनांकडे परत

निमालें राहिलें गेले ऐसे म्हणती । वायां फजीत होती आपुल्या मुखें

nimalen rahilen gele aise mhanati | vayan phajit hoti apulya mukhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निमालें राहिलें गेले ऐसे म्हणती । वायां फजीत होती आपुल्या मुखें ॥१॥ नासलें कलेवर घेऊनियां मांडीं । वाउगे तें तोंडी बोलताती ॥२॥ स्वयें आत्मज्योति जया नाहीं आदिअंत । तो आत्मा प्रत्यक्ष निमाला म्हणती ॥३॥ एका जनार्दनीं उफराटी बोली । कैसी भ्रांती पडली त्यांचे मनीं ॥४॥