भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीळवर्ण घनःश्याम । अत्माराम विटेवरी

nilavarna ghanahshyam | atmaram vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नीळवर्ण घनःश्याम । अत्माराम विटेवरी ॥१॥ चला जाऊं तया गांवा । उगवुं गोवां तांतडीं ॥२॥ भेटलिया मनोरथ । पुरती अर्थ मनाचें ॥३॥ साधे साधन फुकटचे । एका जनार्दनीं भाक साची ॥४॥