भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळां विठ्ठल देव

nila pandharapuracha lavanyaputala | dekhilase dolan viththal dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळां विठ्ठल देव ॥१॥ जीव वेधला वो वेधला वो । पाहतां पाहतां जीव वेधला वो ॥२॥ एका जनार्दनीं पाहातांचि देव । वेधिला जीव परतेना भाव ॥३॥