भजनी मालिका
← भजनांकडे परत

निज सायासें जोडुनी । होतें निक्षेपुनी ठेविलें

nij sayasen joduni | hoten nikshepuni thevilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निज सायासें जोडुनी । होतें निक्षेपुनी ठेविलें ॥१॥ तेंचि दिधलें माझया हातीं । आजीं संतीं कृपादान ॥२॥ कल्पादीचें पुरातन । जें महा धन परमार्थिक ॥३॥ निळा म्हणे पोटा आलों । म्हणोनि झालों अधिकारी ॥४॥