भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला

nichache sangati devo vitalala | paniye prakshaloni sonvala kela

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥ मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥ सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे । वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥ चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥