भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणों तुमचे मन कठिण कां झालें । मज कांहीं न कळे पूर्व कर्म

nenon tumache man kathin kan jhalen | maj kanhin na kale purva karma

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नेणों तुमचे मन कठिण कां झालें । मज कांहीं न कळे पूर्व कर्म ॥१॥ किती आठवण मागिलाचि करूं । तेणें पडे विचारू पुढीलासी ॥२॥ आतां अवघड दिसतें कठीण । मनाचें हें मन चिताडोहीं ॥३॥ चोखा म्हणे काय करूं तें आठवेना । निवांत वासना कई होय ॥४॥