भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणों कोणे काय देवासी दिधलें । मागत वाहिलें तयापाशीं

nenon kone kay devasi didhalen | magat vahilen tayapashin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नेणों कोणे काय देवासी दिधलें । मागत वाहिलें तयापाशीं ॥१॥ पेरावें जें शेती तेचि फळप्राप्ती । वाया काय गुंती आपुले मनीं ॥२॥ तेव्हां घ्यावें हेंचि पूर्वापार । पुराणी विचार हाचि आहे ॥३॥ चोखा म्हणे उगें देवासी रुसती । आपुलें मनाप्रती प्रसती ना ॥४॥