भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला

neno vitho marga chukala | ughada pandharapura ala

नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला । भक्तें पुडलिकें देखिला । उभा केला विटेवरी ॥१॥ तो हा विठोबा निधान । ज्याचें ब्रह्मादिकां ध्यान । पाउलें समान । विटेवरी शोभती ॥२॥ रुप पाहतां तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु । महिमा वर्णितां महेशु । जेणें मस्तकीं वंदिला ॥३॥ भक्तिसुखें लांचावला । जाऊं नेदी उभा केला । निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मीं न विसंबे ॥४॥