भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हती माझे फुकट बोल । जाणे विठ्ठल सत्य मिथ्या

navhati majhe phukat bol | jane viththal satya mithya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नव्हती माझे फुकट बोल । जाणे विठ्ठल सत्य मिथ्या ॥१॥ संतकृपेची हे जाती । ओघेंचि चालती अक्षरें ॥२॥ कैंची मती बोलावया । ठायींचि पायां विदित तें ॥३॥ निळा म्हणे बाहेरी आलें । होतें सांठविलें ह्रदयीं जें ॥४॥