भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवमास वरी वाहिलें उदरीं । तिसी दारोदारीं हिंडावितो

navamas vari vahilen udarin | tisi darodarin hindavito

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नवमास वरी वाहिलें उदरीं । तिसी दारोदारीं हिंडावितो ॥१॥ लालन पालन करीत आवडी । जोडली ती जोडी नेदी तिसी ॥२॥ सर्व भावें दास बाइलेचा जाहला । एका जनार्दनीं आबोला धरी माते ॥३॥