भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा

naval ti kala davi gopikansi | loni chorayasi jato ghara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥ धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥ द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥ एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥