भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल हे कृपा घनवट । उडवूनी मायेचें फळकट । आप आपणां केलें प्रगट । मोडिली वाट दुसयाची

naval he krupa ghanavat | udavuni mayechen phalakat | ap apanan kelen pragat | modili vat dusayachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नवल हे कृपा घनवट । उडवूनी मायेचें फळकट । आप आपणां केलें प्रगट । मोडिली वाट दुसयाची ॥१॥ आपणांसवें आपण खेळे । आपआपणासी चावळे । शेखीं आपण आपणा मिेळे । खेळतां वेगळें दाउनि ॥२॥ ऐसा आपुलिया संतोषा । एकी भिन्नत्वाची आशा । अनेकत्वाचा मिरउनी ठसा । एकी येकला शेवटीं ॥३॥ दाऊनियां नानाकार । नानाकृति नारीनर । तेचि करुनियां निराकार । आपणाअंगी आपण ॥४॥ निळा म्हणे कृपातरणी । प्रगटोनियां माझिये वाणी । प्रकाशी आपुला किणीं । लाविली गुणीं वर्णावया ॥५॥