भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल दावियेलें सोंग । अवघा एकक पांडुरंग

naval daviyelen song | avagha ekak pandurang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नवल दावियेलें सोंग । अवघा एकक पांडुरंग ॥१॥ हें तों आलें अनुभवा । विठ्ठल देवा पाहतांची ॥२॥ मन पवनांची धारणा । तुटली वासना विषयाची ॥३॥ एका जनार्दनीं परिपुर्ण । एका एकपण देखतां ॥४॥