भजनी मालिका
← भजनांकडे परत

नावडें तें जना देवा । कां हो वदवा मज हातीं

navaden ten jana deva | kan ho vadava maj hatin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नावडें तें जना देवा । कां हो वदवा मज हातीं ॥१॥ आइते प्रसाद संतवाणी । अमृतझरवणी सुस्वाद ॥२॥ सत्यस्वानुभव बोलिलें जें जें । प्रगटूनि सहजें सिध्दांत ॥३॥ निळा म्हणे तुमच्या वरदें । यथानुवादें वचनें तिये ॥४॥