भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व

nashivant dhan nashivant man | nashivant jan kaya sarva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥१॥ नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करती ॥२॥ नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळें । नाशिवंत बळें गळां पडती ॥३॥ एका जनार्दनीं सर्व नाशिवंत । एकचि शाश्वत हरिनाम ॥४॥