भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण । धरिला अभिमान त्याचा तुम्हीं

narasinh mehata gujarathi bramhan | dharila abhiman tyacha tumhin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण । धरिला अभिमान त्याचा तुम्हीं ॥१॥ व्दारकेसी त्याच्या हुंडया भरियेल्या । शोभनासी नेल्या वस्त्रें पेटया ॥२॥ जनजसवंत रायराजेश्वर । केला त्याचा थोर बहुमान ॥३॥ निळा म्हणे कुवा कुल्‍लाल हरिभक्त । पीपा रजपुत प्रिय तुम्हां ॥४॥