भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले । आनंदे लागले हरिभजनीं

nara mahada gonda vitha chaughe putra jahale | anande lagale haribhajanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले । आनंदे लागले हरिभजनीं ॥१॥ नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद । आठविती गोविंद वेळोवेळां ॥२॥ एका जनार्दनीं कायावाचामन । वेधलेंसे जाण विठ्ठलचरणीं ॥३॥