भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमोजि विश्वतीता

namoji vishvatita

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नमोजि विश्वतीता । विश्रवव्यापका श्रीअनंता । परात्परा सद्गुरुनाथा । ईश्रवरनियंता सकळादी ॥१॥ तुमचा अनुग्रहो झालिया । निरसे मोह ममता माया । करुनी उपदेश ब्रम्हया । निजात्मपदी स्थापिसी ॥२॥ सनकादिकांचे चिंतन । नाम तुमचे अनुसंधान । त्यातें स्वरुप स्थिती पावउन । ठेविसी निमग्न निजानंदी ॥३॥ शुक्र प्रल्हाद नारद । पावोनिया तुमचा बोध । करिती सदा ब्रम्हानंद । तारिती कीर्तने आणि‍का ॥४॥ निळा म्हणे परमानंदा । परात्परा सच्चिदानंदा । सद्गुरुराया निजात्मबोधा । कृपेस्तव लाहिजे तुमाचिये ॥५॥