भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या

namo dnyanaraja namo dnyanaraja | nivrutti sahaja guruvarya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या ॥१॥ नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कर्‍हातटीं ॥२॥ समाधि वैभव पाहतां नयनीं । चुकतसे आयणी जन्मव्याधि ॥३॥ एका जनार्दनीं म्हणावा आपुला । अंकित अंकिला दास तुमचा ॥४॥