भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज

namo aganitaguna devadhideva | majhya sopanadeva naman tuj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥ संवत्सर ग्राम कर्‍हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥ जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवा ॥३॥ तुमचा प्रसाद द्यावा माझे हातीं । एका जनार्दनीं विनंती करीतसे ॥४॥