भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामीं गोंवियली वाचा । मनीं संकल्प हा तुमचा

namin gonviyali vacha | manin sankalpa ha tumacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नामीं गोंवियली वाचा । मनीं संकल्प हा तुमचा ॥१॥ ऐसा वेष्टलों जी हरी । हातें पायें अवघ्यापरी ॥२॥ देखों जाय रुप तें दिठी । श्रवणीं त्याही तुमच्या गोष्टी ॥३॥ निळा म्हणे घरीं दारीं । देशी तूंचि देशांतरीं ॥४॥