भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामेंचि तुमचीं आळवितां । न पुरे धणी पंढरीनाथा

namenchi tumachin alavitan | na pure dhani pandharinatha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नामेंचि तुमचीं आळवितां । न पुरे धणी पंढरीनाथा ॥१॥ याचि सुखें कल्पकोडी । जातां वेळ वाटे घडी ॥२॥ जडता नामीं निजध्यास । नाहीं काळ गणना त्यास ॥३॥ निळा म्हणे निश्चय माझा । जाणतां तुम्ही पंढरीराजा ॥४॥