भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामेंचि पावन केली क्षिती । घोषें निजशांति पातका

namenchi pavan keli kshiti | ghoshen nijashanti pataka

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नामेंचि पावन केली क्षिती । घोषें निजशांति पातका ॥१॥ जये गांवी जये देशी । वसती त्यांसी सुखलाभ ॥२॥ सुदर्शन फिरे वरी । विघ्ना बोहरी करावया ॥३॥ निळा म्हणे कळिकाळ कांपे । नांदती प्रतापें हरिजन ॥४॥