भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामेंचि पावलें पैलपार । शुकादि साचार नामें जगीं

namenchi pavalen pailapar | shukadi sachar namen jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामेंचि पावलें पैलपार । शुकादि साचार नामें जगीं ॥१॥ तें नाम सोपें वाचे रामकृष्ण । उच्चिरतीं जाण वैकुंठ जोडे ॥२॥ नामें पावले मोक्षपद गती । नाम हे विश्रांती सर्व जीवां ॥३॥ एका जनार्दनीं नाम हें तारका । वेदाचा विवेक रामनाम ॥४॥