भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामें तारिलें तारिले । महा पातकीं उद्धारिलें

namen tarilen tarile | maha patakin uddharilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामें तारिलें तारिले । महा पातकीं उद्धारिलें ॥१॥ ते हें सोपें रामनाम । जपतां निवारे क्रोध काम ॥२॥ नामें पावन जाले क्षिती । ऐसे पुराणे गर्जती ॥३॥ नाम सारांचे हें सार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥