भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमस्कारी जंव अष्टांगें । तंव देवाचि जाला अंगें

namaskari janv ashtangen | tanv devachi jala angen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नमस्कारी जंव अष्टांगें । तंव देवाचि जाला अंगें ॥१॥ आतां जमन कैसें हो कीजे । देवपणा न येचि दुजें ॥२॥ स्तुतिस्तवन बोलों भावो । तंव वायांची जाली देवो ॥३॥ स्तवन करूं आतां कैसें । स्तवावया दुजें नसे ॥४॥ आतां भजन कैशापरी । संसारा नुरेचि उरी ॥५॥ एका जनार्दना शरण । तंव तो जाला जनार्दन ॥६॥