भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामरुपीं प्रीति कीं ध्यानीं सगुण मूर्ति

namarupin priti kin dhyanin sagun murti

नामरुपीं प्रीति कीं ध्यानीं सगुण मूर्ति । हेचि तुझी यश कीर्ति जाणोनियां ॥ ह्रदयीं तुझें रुप मुखीं नाम घोष । नैवेद्य प्रसाद जठरीं आम्हा ॥ निर्माल्य मस्तकीं वंदूं तुमचे चरण हाचि अच्युता तुमचा महिमा रया ॥१॥ अखंड नाम वाचे हेंचि तप साचें । तेंचि स्वरुप दिसें ह्रदयीं तुझें ॥२॥ तुझें नाम निर्धारितां हेंचि गा तप आतां । काया वाचा मनें न विसंबे तत्त्वतां । म्हणौनि आसनीं पंथी शयनीं जड पडो भलतैंसे परि नाम न संडी अनंता । जीवाचिया जीवना सगुणगुणनिधाना हेंचि प्रेम देई निज भक्ता रया ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला आनंद सुखाचिया वोवरा । पाहे तंव भरला दशदिशा दुसरा न दिसे सोयरा । तेविं गुण नामकीर्ति तेचि आम्हा मूर्ति ह्रदयीं न विसंबे दातारा । येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळ आतां जोडलासी माहेरा रया ॥४॥