भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामरुप नातळे ज्यासी । परात्पर ऐशी वदंती

namarup natale jyasi | paratpar aishi vadanti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नामरुप नातळे ज्यासी । परात्पर ऐशी वदंती ॥१॥ तो हा आला पंढरपुरा । समाचारा भक्तांच्या ॥२॥ ओळखिला पुंडलिकें । केलें निकें पूजन ॥३॥ निळा म्हणे विटेवरी । स्थापिला तीरीं चंद्रभागे ॥४॥