भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्मा लक्षिलें नामपाठें

namapathen ohan sohan kohan khadalen | parabrahma lakshilen namapathen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्मा लक्षिलें नामपाठें ॥१॥ अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खूण नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका कोहंपणा वेगळा । जनार्दनें कुर्वाळिला अभय दानीं ॥३॥ हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती