भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें नामा शिंपी तो तरला तयाची देवाला आवड मोठी

namapathen nama shimpi to tarala tayachi devala avad mothi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें नामा शिंपी तो तरला तयाची देवाला आवड मोठी ॥१॥ जाऊनी जेवणें उच्छिष्ठ भक्षणें । नामपाठें देणें इच्छिलें तें ॥२॥ जनार्दनाचा एक सद्‍गदित होय । नामपाठ गाय आवडीनें ॥३॥