भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गजेंद्र उद्धरे नामपाठे

namapathen nakra tarila nirdharen | gajendra uddhare namapathe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गजेंद्र उद्धरे नामपाठे ॥१॥ तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतापुढे ॥३॥